पोलीस पाटील पदाकरीता 9 नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत

सिंधुदुर्गनगरी दि.8 (जि.मा.का) : सावंतवाडी उपविभागातील तहसिल सावंतवाडी, वेंगुर्ला, आणि दोडामार्ग या तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाकरीता, सावंतवाडी तालुक्यातील- 36, वेंगुर्ला तालुक्यातील -72 आणि दोडामार्ग तालुक्यातील -17, अशा एकूण 125 पदांकरीता दि. 9 नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत होणार आहे. मंजूर बिंदूनामावलीप्रमाणे प्रचलित शासकीय तरतुदीनुसार आरक्षण निश्चित संबंधित गावाचे लोकसंख्येनुसार व चिठ्ठीव्दारे करावयाची असून त्याकरीता आरक्षण सोडत काढण्याकरीता दि. 9 नोव्हेंबर 2023 रोजी सायं. 5 वाजता तहसिलदार कार्यालय, सावंतवाडी येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी संबंधित गावातील इच्छुकांनी उपस्थित राहावे, असे उपविभागीय दंडाधिकारी तथा, पोलीस पाटील पद भरती प्रक्रीया समितीचे अध्यक्ष प्रशांत पानवेकर यांनी कळविले केले आहे. सांवतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यातील पोलीस पाटील पद रिक्त असणारी गावे पुढीलप्रमाणे आहेत. सावंतवाडी- कलंबिस्त, डिंगणे,मासुरे, नाणोस, साटेली त. सातार्डा, केगद ,सोनुर्ली, मळगांव, ब्राहमणपाट, गुळदुवे, उडेली, कुंभारवाडा, पारपोली, धाकोरा, बांदा, सरमळे, कोंडूरा, निरुखे, तांबोळी, सावरजूवा, भोम, घारपी, भटपावणी, भैरववाडी, न्हावेली, सावरवाड, क्षेत्रफळ, देवसू, नेने, कुंभार्ली, निरवडे, डेगवे, डोंगरपाल,फणवसडे , आरोस (गावठाण), पडवे यांचा समावेश आहे. वेंगुर्ला - वेंगुर्ला,मठ, मातोंड, तुळस, होडावडा, वजराठ, वेतोरे, केळूस, कोचरा,म्हापण, कामळेवीर, परुळे भाग -२, सतये, नवाबाग, वाघेश्वर, परबवाडा, सिद्धार्थवाडी, नमस,आडारी, भेंडमळा, सुखटणबाग,कांबळेवाडी, वरचेमाड, कुर्लेवाडी, मुठ, गिरपवाडी, पलतड, खटारवाडी,परबवाडी, सुभाषवाडी, जोसोली, न्हैचीआड, वडखोल, पेंडूर, सातवायंगणी, बागायत, परबगाव, वेळागर, गांधीनगर,वरचीकेर, खालची केर, सुकळभाट, बोंबडोजीचीवाडी, म्हारतळे, कनयाळ, गावतळे, हुडा, सोन्सुरे, बांध, टेंब,सागरतीर्थ, सखैलखोल , टांक, खालचीवाडी, भोगवे, शेळपी, कर्ली, चिपी, रावदस, गवाण, खवणे, मायने,श्रीरामवाडी, मेढा, वरचीआड, पालकरवाडी, काळवी, तळेकरवाडी, वायंगणी, भंडारवाडा, देवसू, पिंपळगाव यांचा समावेश आहे. दोडामार्ग - खडपडे, पाट्ये, मांगेली, पणतुर्ली, घोटगेवाडी, खानयाळे, कुडासे, केर, शिरंगे, साटेली – भेडशी, कुंब्रल, पाल, उसप, पाळ्ये तळकट, कुंभवडे, भिकेकोनाळ यांचा समावेश आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'