मराठा समाजातील पात्र माजी सैनिक,माजी सैनिक विधवा पत्नी मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र देण्याकरीता माहिती संकलित करण्याचे काम सुरु

सिंधुदुर्गनगरी, दि.7 (जि.मा.का): जिल्ह्यातील मराठा समाजातील पात्र माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांनी त्यांचे जवळ असलेल्या मराठा- कुणबी, कुणबी- मराठा या जातीचा कागदोपत्री पुरावा, सैन्यसेवा पुस्तक, ओळखपत्र या कागदपत्रासह तात्काळ जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष भेट देऊन सादर करावेत. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासनाकडून मराठा समाजातील पात्र व्यक्तींना मराठा - कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याकरीता माहिती संकलित करण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. त्या अनुषंगाने, या कार्यालयास जिल्ह्यातील मराठा समाजातील पात्र माजी सैनिक, पत्नी यांची माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालय, यांच्याकडून प्राप्त झाले आहेत. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 02362 228820 वर संपर्क साधावा. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'