मराठा कुणबी नोंद अभिलेखाची नागरीकांकडून मागणी

सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का): जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करणेत येते की, जिल्ह्यातील नागरीकांनी त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्ताऐवज, इ. जुनी अभिलेख या कार्यालयातील विशेष कक्षात (सामान्य शाखेत) दिनांक २१ ते २४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत सादर करावेत. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. राज्यातील मराठा समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात संबधित व्यक्तींनी सक्षम प्राधिकारी यांचेकडे कुणबी जातीसंदर्भात सादर केलेल्या निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजामकाळात झालेले करार, राष्ट्रीय दस्ताऐवज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी कशी करावी व तपासणी अंती मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करणेसाठी मा. न्यायमुर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे. शासन निर्णयान्वये अवलंब करावयाच्या कार्यपध्दती बाबत सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अभिलेख पडताळणीचे काम युध्दपातळीवर सुरु असून ते अतिम टप्प्यात आहे. सदर कामाचा आढावा घेणेसाठी मा.न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखालील समिती या कार्यालयात येणार असून दिनांक ११ डिसेबर २०२३ ला सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे सदरची आढावा सभा होणार आहे. जिल्ह्यातील नागरीकांकडून पुरावे / कागदपत्रे समिती कामकाजाकरीता स्वीकारणेच्या सूचना दिलेल्या आहेत. अधिक माहितीसाठी या कार्यालयाच्या विशेष कक्षातील सदस्य संतोष खरात, नायब तहसिलदार भ्रमणध्वनी क्रमांक- ९४०४३९५३५५ यांचेशी संपर्क साधावा. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'