मिलेट च्या वापरातून खाद्य पदार्थाचा प्रचार व प्रसार करण्यासाठीचा मेळावा संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि.9 (जि.मा.का): ईट राइट इंडिया या उपक्रमांतर्गत भरड धान्य किंवा तृणधान्य (मिलेट) यांचे दैनंदिन आहारातील महत्व व त्यांचे शरीराला होणारे फायदे लक्षात घेता. मिलेट चा प्रचार व प्रसार करण्यासाठीचा मेळावा कणकवली येथे संपन्न झाला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त मो.शं. केंबळकर यांनी दिली. तृणधान्य वर्ष २०२३ चे औचित्य साधून अन्न व औषध प्रशासन, सिंधुदुर्ग कार्यालय, रिगल कॉलेज, जानवली, ता. कणकवली आणि योगतज्ञ गावडे काका यांच्या ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने कणकवली येथे दि. ८ नोव्हेंबरला मिलेट मेळा व योगसत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये FSSAI, नवी दिल्ली यांनी देशपातळीवर सुरू केलेल्या ईट राईट इंडीया या उपक्रमाअंतर्गत भरड धान्य किंवा तृणधान्य (मिलेट) यांचे दैनदिन आहारातील महत्व व त्यांचे शरीराला होणारे फायदे यासंदर्भात रिगल कॉलेज मधील हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांना माहिती व्हावी व भरडधान्य (मिलेट) चा वापर आपल्या दैनंदिन आहारामध्ये वाढावा तसेच सदर मिलेटच्या वापराबाबत व्यापक प्रचार व प्रसार व्हावा, या हेतुने विद्यार्थ्यांकडून मिलेटचा वापर करून तयार करण्यात आलेल्या विविध खाद्यपदार्थांचा मेळावा भरवण्यात आला होता. मेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमात अन्न व औषध प्रशासन सिंधुदुर्ग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) - मोहन केंबळकर, सहाय्यक आयुक्त (औषधे) - मिलिंद पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंके, रिगल कॉलेज च्या प्राचार्या तृप्ती मोंडकर, योगतज्ञ - गावडे काका, योगशिक्षक आनंद सावंत, योगशिक्षिका मारिया डिसोजा यांनी विद्यार्थ्यांना तृणधान्याचे दैनंदिन आहारातील महत्व व योगाचे प्रात्यक्षिक दाखवून त्याचे शरीराला होणारे फायदे याबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'