स्वयंसेवक म्हणून नाव नोंदणी करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का):- मागील 03 वर्षात सैन्यातून निवृत्त झालेल्या व आपल्या गावातील, तालुक्यातील शाळांमध्ये विद्याथ्यींना संचलन, व्यायाम, शिस्त व मनोबल इत्यादीबाबत प्रशिक्षण देण्याकरीता स्वयंसेवक म्हणून काम करु इच्छिणाऱ्या माजी सैनिकांनी सैन्यसेवा पुस्तक, माजी सैनिक ओळखपत्रासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिधुदुर्ग येथे दिनांक 10 जुनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.
पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण, मंत्री शंभुराज देसाई संचालक, सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी व सैनिक जिल्हा कल्याण अधिकारी, सिंधुदुर्ग यांची दिनांक 29 मे रोजीच्या दुरदृष्य प्रणालीव्दारे बैठक पार पडली.या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम व राष्ट्रभक्ती जागृत करण्यासाठी महीन्याच्या शेवटच्या शनिवारी स्वयंसेवक माजी सैनिकांमार्फत सैन्याबाबत 1 तास प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच हा दिवस Happy Saturday म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे. जेणेकरुन भविष्यात हेच विद्यार्थी सैन्यात भरती होऊन संरक्षण दलास बळकटी देतील व आपले व आपल्या देशाचे नाव उज्वल करतील.
अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक ०२३६२-२२८८२०/९३२२०५१२८४ वर संपर्क करावा.
०००००००
Comments
Post a Comment