कृषी विभागाकडून भरारी पथक व निविष्ठा तक्रारकक्षाची स्थापना
सिंधुदुर्ग, दिनांक 26 मे 2025 (जिमाका वृत्त) :- खरीप हंगामासाठी सन 2025-26 साठी कृषी निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्ष व भरारी पथके स्थापक करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे.
खरीप हंगामासा सन 2025-26 करिता बियाणे, खते, व कीटकनाशके या कृषि निविष्ठांचा दर्जेदार तसेच सुरळीत व वेळेवर मुबलक पुरवठा होण्यासाठी कृषी विभाग सातत्याने प्रयत्न करत आहे. या निविष्ठांबाबतचा गुणवत्ता नियंत्रणाकरिता प्रत्येक तालुकास्तरावर भरारी पथकांची स्थापना केली आहे. तालुका कृषी अधिकारी हे या भरारी पथकांचे अध्यक्ष असून पंचायत समिती कृषी अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. जिल्हास्तरावरही भरारी पथकाची स्थापना करण्यात आली असून कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद हे अध्यक्ष आहेत व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक हे सदस्य सचिव आहेत.
कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद आणि जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या स्तरावर कृषी निविष्ठा तक्रार कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा तक्रार कक्ष सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत कार्यरत असणार आहे.
सद्या जिल्ह्यात बियाणे, खते पुरवठा सुरळीत सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रांमधून आवश्यक कृषी निविष्ठांची खरेदी करावी. तसेच बियाणे, खते व कीटकनाशके खरेदीची पक्की बिले घ्यावीत व वापरताना सुरक्षा उपयांचे काटेकोर पालन करावे.
जिल्हास्तर भरारी पथक प्रमुखांचे संपर्क क्रमांक – जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सचिन कांबळे, मोबा.9421863509 व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सुशांत भोसले मोबा. 827568385.
तालुका स्तरावरील भरारी पथक प्रमुख्यांचे संपर्क क्रमांक:-
कणकवली तालुका कृषी अधिकारी - 9404953146, मालवण तालुका कृषी अधिकारी -7588185519, देवगड तालुका कृषी अधिकारी -7083840220, वैभववाडी तालुका कृषी अधिकारी - 7350315726, सावंतवाडी तालुका कृषी अधिकारी - 9021773947, कुडाळ तालुका कृषी अधिकारी -8308246444, वेंगुर्ला तालुका कृषी अधिकारी -9421027424, दोडामार्ग तालुका कृषी अधिकारी -9049408534.
जिल्हा स्तरावरील तक्रार कक्षाचा संपर्क क्रमांक –
कृषी विकास अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद -9421261145, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय - 9420244762.
तालुकास्तरावरील तक्रारकक्षाचे संपर्क क्रमांक -
कृषी अधिकारी पंचायत समिती, कणकवली –7620273036, 9422967554,
कृषी अधिकारी पंचायत समिती, मालवण – 9527693574, 9420210402,
कृषी अधिकारी पंचायत समिती, देवगड – 9422967918, 9420977079,
कृषी अधिकारी पंचायत समिती, वैभववाडी – 9270787640, 9422374411,
कृषी अधिकारी पंचायत समिती, सावंतवाडी – 9403960765, 9404396813,
कृषी अधिकारी पंचायत समिती, कुडाळ -9423024874, 9423323588,
कृषी अधिकारी पंचायत समिती, वेंगुर्ला – 9405222333, 9403051386
कृषी अधिकारी पंचायत समिती, दोडामार्ग – 9588439320, 9420365047. या प्रमाणे आहेत.
तरी जिल्ह्यतील शेतकऱ्यांना खते, बियाणे याबाबत काही तक्रारी असल्यास तक्रार कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment