द्रवनत्र वाहतुकीसाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.26 (जि.मा.का): जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, कणकवली या कार्यालयाकडून जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थांना महिन्यातून एकदा द्रवनत्र रेतमात्रा इत्यादीची पुरवठा वाहतूक करण्यासाठी एक वर्षाचा भावबंद करार कालावधीसाठी खाजगी वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांकडून दरपत्रके मागविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. समीर बिलोलीकर यांनी दिली आहे. हे दरकरार दिनांक १ एप्रिल २०२५ ते दिनांक ३१ मार्च २०२६ या कालावधीसाठी असुन तरी इच्छुक पुरवठादार यांनी आपली दरपत्रके दिनांक २२ मे २०२५पर्यंत मागविण्यात आलेली होती. काही दरकराराच्या प्रक्रीयेसाठी फक्त एक दरपत्रक लिफाफा आल्याने या प्रक्रीयेस पुन्हा मुदतवाढ देण्यात येत असून दरपत्रके दि. २ जून २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मोहोरबंद लिफाफ्यात सादर करावी. दरपत्रके दिनांक ३ जून २०२५ रोजी सकाळी ११.३० वा. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, सिंधुदुर्ग येथे नियुक्त समिती समोर उघडण्यात येतील व वाहतुकीचा कमीत कमी दर नमूद केलेल्या पुरवठादार यांना पुरवठा आदेश देण्यात येतील. अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाचे दुरध्वनी क्र. ०२३६२-२२८८०८ किंवा ई-मेल पत्ता वर ddcahsindhudurg@gmail.com संपर्क साधावा.

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'