सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताज हॉटेल इंडस्ट्रीजने गुंतवणूक करावी यासाठी पालकमंत्री प्रयत्नशील •मंत्रालयात पालकमंत्री यांनी घेतली ताज ग्रुपच्या अधिकाऱ्यांची बैठक •प्रकल्प उभारणीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन

सिंधुदुर्गनगरी दि 15 (जिमाका) : पर्यटन दृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा अधिक विकसित व्हावा ,स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी पालकमंत्री नितेश राणे हे प्रयत्नशील आहेत. ताज हॉटेल्स अँड हॉस्पिटॅलिटीचे व्यवस्थापकीय संचालक पुनीत चटवाल आणि कार्यकारी उपाध्यक्ष बीजल देसाई तसेच ताज हॉटेल इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापणासोबत बैठक घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रकल्प उभारण्याचे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी संबंधिताना केले आहे. पर्यटन क्षेत्रात विश्वासार्हता असलेल्या ताज हॉटेल्सने सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासात्मक उंचीवर नेण्यासाठी प्रकल्प उभारावा आम्ही त्यांना सर्वतोपरी सहकार्य आणि मदत करू असे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिले. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'