जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांनी 1 जूनपर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 22 मे 2025 (जिमाका वृत्त) :- जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांनी www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेस्थळावर 1 जूनपर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे, यांनी केले आहे. जिल्हयातील एकूण 1 हजार 965 सेवानिवृत्त अधिकारी,माजी सैनिक,माजी सैनिक विधवा पत्नी,वीरनारी,अवलंबित यांनी सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिलेल्या www.mahasainik. maharashtra.gov.in या संकेस्थळावर On Line Registration केले आहे. तथापि, उर्वरीत सुमारे 3 हजार 604 सेवानिवृत्त अधिकारी,माजी सैनिक,माजी सैनिक विधवा पत्नी,वीरनारी ज्यांची या कार्यालयाच्या रोजगार पटावर नोंद आहे त्यांनी सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिलेल्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेस्थळावर जाऊन दिनांक 1 जुन 2025 पर्यंत ऑनालाईन नोंदणी करावयाचे आहे. तसेच नोंदणी केल्यानंतर त्याबाबतचा भरलेला फॉर्म प्रत्यक्ष येऊन जिल्हा सैनिक कायार्लय, सिंधुदुर्ग येथे जमा करुन त्याबाबतची खात्री करावी. ज्या माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांचे ओळखपत्र खुपच खराब अथवा वापरण्यास योग्य नाही, त्यांना नवीन ओळखपत्र त्वरीत दिले जाईल व उर्वरीत नोंदणी केलेल्या माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांना नवीन ओळखपत्र केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडून प्राप्त झाल्यावर दिले जाईल याची नोंद घ्यावी. यापुढे या कार्यालयाकडून कल्याणकारी निधी व KSB च्या आर्थिक मदती तसेच इतर योजनांच्या आर्थिक मदतीचे अर्ज संबंधित माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी यांनी सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिलेल्या www.mahasainik maharashtra.gov.in या संकेस्थळावर ऑनालाईन नोंदणी केली असल्याची खात्री करुनच स्विकारले जातील व त्यांनाच आर्थिक मदती दिल्या जातील याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र-०२३६२-२२८८२०/९३२२०५१२८४ वर संपर्क करावा. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'