प्रजासत्ताक दिन सोहळ्याकरिता सुजाता गोसावी यांना विशेष निमंत्रण

सिंधुदुर्गनगरी दिनांक 20 (जिमाका) :- बचतगटाच्या माध्यमातून जल जीवन मिशन अंतर्गत विशेष कार्य केल्याबद्दल वेंगुर्ला म्हापण येथील श्रीमती सुजाता बाळकृष्ण गोसावी यांना जल शक्ती मंत्रालय नवी दिल्ली यांच्या वतीने नवी दिल्ली येथे आयोजित 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिन सोहळ्याकरीता विशेष निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जल जीवन मिशन तथा जिल्हा समन्वयक, स्वभामि (ग्रा), प्रकल्प संचालक विशाल तनपुरे यांनी दिली. श्रीम सुजाता बाळकृष्ण गोसावी, म्हापण, ता. वेंगुर्ला यानी आपल्या बचत गटाच्या माध्यमातुन जल जीवन मिशन अंतर्गत गावातील नळपाणी योजना चालविण्यास घेतली आहे. या योजनेचे पाणी सोडणे, पाईप लाईन दुरुस्ती, नळ जोडनी, पाणीपट्टी वसुली आदी कामे त्या बचत गटाच्या माध्यमातुन करतात. यामुळे बचतगटाला आर्थिक फायदा झाला आहे. याची दखल घेत वेंगुर्ला म्हापण येथील श्रीम सुजाता बाळकृष्ण गोसावी व त्याचे पती बाळकृष्ण सिताराम गोसावी यांना दिनांक 23 ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित प्रजासत्ताक दिना सोहळ्याकरीता विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'