सिंधुरत्न समृद्ध योजने अंतर्गत काजू बोंडूपासून रस काढण्याकरिता यंत्र खरेदी योजनेंचा लाभ घेण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि.२३ (जि.मा.का.) : जिल्ह्यात सिंधुरत्न समृध्द योजनेंतर्गत काजु बोंडुपासून रस काढण्याकरीता ७५ टक्के अनुदान तत्वावर यंत्र खरेदी योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त काजू उत्पादक शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार असून या योजनेचा लाभ घेण्याकरीता तालुका कृषी कार्यालय अथवा संबंधित क्षेत्रीय कृषी सहाय्यक यांच्यशी संपर्क साधून शेतकऱ्यांनी ५ फेब्रुवारी २०२५ पर्यत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण काजू पिकाखालील क्षेत्र साधारणतः ७२,१२५ हे. आहे. जिल्ह्यात काजू पिकांमध्ये काजू बी चा वापर पुढील प्रक्रियेसाठी केला जातो व उर्वरित काजू बोंडू वाया जातो. या वाया जाणाऱ्या बोंडूपासून रस काढून त्यापासून विविध उत्पादने तयार केली जाऊ शकतात व त्यांच्या विक्रीतुन शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होऊ शकते. याकरिता सिंधुरत्न समृद्ध योजना सन २०२४-२५ अंतर्गत काजू बोंडूपासून रस काढण्यासाठी यंत्र खरेदी योजनेकरिता ७५ टक्के अनुदान तत्वावर मंजुरी देण्यात आली आहे.
या योजनेस पात्र शेतकऱ्याकडे ०.१० हे. क्षेत्र काजू पिकाखालील असावे व याकरिता एका कुटुंबातील एकाच लाभार्थ्यास लाभ देण्यात येईल, अनुसुचीत जाती व अनु. जमाती, महिला तसेच अल्प व अत्यल्प शेतकर्ऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
काजू बोंडूपासून रस काढण्यासाठी यंत्र खरेदीकरिता प्रति लाभार्थी रक्कम रु. ७७,०००/- (जीएसटी वगळून) एवढा खर्च अपेक्षित असून त्यानुसार ७५ टक्के अनुदाना प्रमाणे जास्तीत जास्त रक्कम रु. ५७,७५०/- एवढे अनुदान देय राहील. योजनेकरीता ७/१२, ८ अ, बँक पासबुक, आधार कार्ड व रेशन कार्ड इ. कागदपत्रे आवश्यक आहेत.
०००००
Comments
Post a Comment