कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत इस्रायल येथे रोजगाराची संधी

सिंधुदुर्गनगरी, दि. 13 (जि.मा.का.) : शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत जिल्ह्यातील उमेदवारांना, इस्रायल देशामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती विभागाने दिली आहे. या विभागाच्या https://maharashtrainternational.com या संकेतस्थळावर Latest jobs या विकल्पाव्दारे उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इस्रायल देशामध्ये Home Based Caregiver या पदासाठी भरती प्रक्रिया चालू आहे. या पदासाठी पात्रतेचे निकष व जाहिरातीचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या, वय वर्षे 25 ते 45 वयोगटाचे उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत. सोबतच उमेदवारांकडे काळजीवाहू (घरगुती सहायक) सेवांसाठी निपुण/ पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाव्दारे मान्यताप्राप्त असलेले व किमान 990 तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. भारतीय प्राधिकरणाव्दारे प्रदान केलेल्या मिडवायफरीमधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंटमधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक, तसेच जीडीए / एएनएम / जीएनएम/बीएससी नर्सिंग/पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. तरी या संधीचा लाभ जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त यांनी केले आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'