सीएससी सेंटरसाठी अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि.23 (जि.मा.का.) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा पत्नी यांना निवृत्ती वेतनाबाबत स्पर्श प्रणालीत (SPARSH PORTAL) येणाऱ्या अडचणींचे निरसन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सी. एस.सी (Common Service Centres) चालविण्याठी ईच्छुक असलेल्या माजी सैनिकांनी डीजीआर वेब साईट https://dgrindia.gov.in या संकेस्थाळावर 29 जानेवारी 2025 पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
ईच्छुक माजी सैनिकांनी आपली माहिती संकेस्थळावर नोंदणी करुन लेखी स्वरुपात जिल्हा सैनिक कार्यालयास सादर करावी. या करीता इच्छुक असलेल्या माजी सैनिकांना डीजीआरव्दारे मोफत विशेष प्रशिषण देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 02362-228820/9322051284 वर संपर्क साधावा.
००००
Comments
Post a Comment