दिव्यांगांनी अर्थसहाय्य योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, : राज्यातील 18 ते 60 वयोगटातील दिव्यांगाना स्वयंरोजगारासाठी अल्प व्याज दराने कर्ज स्वरुपात अर्थसहाय्य करण्याकरीता वैयक्तिक थेट कर्ज योजना व दिव्यांग स्वालंबन कर्ज योजना राबविण्यात येतात. या योजना अनुक्रमे महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ आणि राष्ट्रीय दिव्यांगजन महामंडळामार्फत राबविण्यात येतात. या महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजनांचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या www.mshfdc.co.in या संकेतस्थळावरील डाऊनलोमध्ये कर्ज योजनांचे अर्ज व महामंडळाचे माहितीपत्रक https://mshfdc.co.in/index.php/2013-04-12-13-20-56 या लिंकवर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अपंग वित्त विकास महामंडळ मर्या.चे जिल्हा व्यवस्थापक के.व्ही. लोहकरे यांनी केले आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'