'नवतेजस्विनी' प्रदर्शनाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.7 (जि.मा.का): 'नवतेजस्विनी' महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत माविम बचत गटांतील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे "नवतेजस्विनी" तालुका स्तरीय भव्य प्रदर्शन विक्री दि.8 ते 13 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा समन्वय अधिकारी नितीन काळे यांनी दिली आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) (महाराष्ट्र शासन अंगीकृत) जिल्हा कार्यालयामार्फत जिल्ह्यातील गरीब, गरजू, मागासवर्गीय, विधवा, परीतक्ता, भूमिहीन महिला अल्पभूधारक महिला व वंचित महिलासाठी बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे कार्य करीत आहे. सद्यस्थितीत सिंधुदुर्ग मध्ये माविम अंतर्गत ग्रामीण भागात 136 गावात, 1 हजार 14 बचत गटांच्या माध्यमातून एकूण 11 हजार 67 महिला तसेच शहरी भागात 58 वार्डात 275 बचत गटांच्या माध्यमातून एकूण 2 हजार 849 महिला असे एकूण 13 हजार 916 महिलांचे संघटन करण्यात आले आहे. दिनांक लोकसंचलित साधन केंद्र नाव कार्यक्रम ठिकाण व वेळ दि.8 ते 10 मार्च 2024 रोजी अन्नपूर्णा लोकसंचलित साधन केंद्र, देवगड कुणकेश्वर मंदिर, ग्रामपंचायत रोड, देवगड रोज सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत दि. 9 ते 12 मार्च 2024 रोजी हिरकणी लोकसंचलित साधन केंद्र कणकवली कणकवली ब्रिजखाली, एस.टी.बस स्टॅड समोर पेट्रोल पंपाजवळ कणकवली रोज सकाळी 10 ते रात्री 10 पर्यत दि.9 ते 12 मार्च 2024 रोजी सिंधुकन्या लोकसंचलित साधन केंद्र कट्टा ता. मालवण जेटी बंदर, मालवण रोज सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत दि. 10 ते 13 मार्च 2024 रोजी स्वाधार लोकसंचलित साधन केंद्र कुडाळ महालक्ष्मी हॉल, पंचायत समिती शेजारी कुडाळ या प्रदर्शनात महिला आरोग्य तपासणी, आपत्कालीन व्यवस्थापन व प्रात्यशिक, उद्योग मार्गदर्शन, महिला उद्योजक सत्कार, महिला तिरंगा थाळी व पाककला स्पर्धा, दशावतार नाटक, खेळ पैठणीचा, महाराष्ट्राची लोकधारा व बचत गट महिला विविध गुणदर्शन इ. सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'