सैनिक कल्याण विभागांतर्गत गट 'क' पदासाठी 24 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करा

सिंधुदुर्गनगरी, दि.5 (जि.मा.का.) : सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील गट-क ची पदे भरण्याकरीता दि. 24 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन सहाय्यक सैनिक जिल्हा कल्याण अधिकारी उमेश आईर यांनी केले आहे. सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील गट क ची पदे भरण्याकरीता दि. 12 फेब्रुवारी सकाळी 11 वाजल्यापासून दि.3 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. तथापि लोकहितार्थ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दि. 4 ते 24 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी सर्व माजी सैनिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'