अंगणवाडी स्तरावरील कामकाज झाले 'स्मार्ट' अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना 1 हजार 588 स्मार्ट फोनचे वाटप

सिंधुदुर्गनगरी, : जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत 1 हजार 539 अंगणवाड्या कार्यरत असून या अंगणवाडयांमध्ये कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका तसेच बीट स्तरावर कार्यरत असलेल्या 49 पर्यवेक्षिका असे एकूण 1 हजार 588 स्मार्टफोनचा पुरवठा राज्य शासनामार्फत करण्यात आलेला आहे. या स्मार्टफोन सॅमसंग कंपनीचे असून मोबाईल सोबत चार्जर, बॅक कव्हर, स्क्रीन गार्ड व अन्य आवश्यक बाबी पुरविण्यात आल्या आहेत. सदर मोबाईलचा उपयोग अंगणवाडी स्तरावरील ऑनलाईन दैनंदिन कामकाज करण्यासाठी होणार असून त्यामुळे एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये पारदर्शकता व गतिमानता येणार असल्याचे माहिती जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले यांनी केले आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'