अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील ग्रामस्थांनी सावधानता बाळगावी

सिंधुदुर्गनगरी, दि.7 (जि.मा.का.) : अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पात पाणीसाठा करण्यात आला आहे. सन 2024-25 च्या हंगामात सिंचन तथा विद्युत विमोचकाचा विहिरीमध्ये आपत्कालीनव्दार उभारणीचे काम करण्याकरीता धरणामध्ये साठा करण्यात आलेले पाणी सिंचन विमोचकाव्दारे नदी पात्रात दि.9 मार्च 2024 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सोडण्यात येणार आहे. तरी नदी पात्रातील पाण्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी ग्रामस्थांनी नदीपात्रात उतरु नये व सावधानता बाळगावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी आधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या मांगवली, वेंगसर, हेत, ता. वैभववाडी व चिंचवली, खारेपाटण ता.कणवकली या गावातील नागरिकांना पुढीलप्रामणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत. वरील गावातील ग्रामस्थांना याबाबतीच माहिती होण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय तसेच गावातील लोकांच्या निदर्शनास येतील अशा ठिकाणी फलकावर सदर बाबत सूचना प्रसिध्द कराव्यात. रात्रीच्या वेळी नागरिकांनी सदर नदी पात्रातून ये जा करु नये. नदीपात्रात कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिला, नदीपात्रात पाण्यासाठी गुरे सोडणारे शेतकरी यांनी याबाबत आवश्यक ती सतर्कता बाळगावी. तालुक्यातील शोध व बचाव गटातील पोहणारे सदस्य यांच्या संपर्कात रहावे व त्यांना याबाबत दक्ष राण्याच्या सूचना देण्यात याव्यात. तालुक्यातील शोध व बचाव साहित्य सुस्थितीत ठेवण्यात यावे. एखादी आपत्तीजनक स्थिती उद्भवल्यास त्याबाबत जिल्हा नियंत्रण कक्षास त्वरित माहिती द्यावी. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'