टपाली मतदान सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि.28 (जि.मा.का): भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 85 व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांना तसेच 40 टक्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांना कोविंड रुग्ण मतदार, निवडणूक कर्तव्यावर असलेले मतदार यांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याकरिता संबंधीत मतदाराना आवश्यक असलेल्या 12 डी नमुन्याचे वाटप सुरु झाले असून सदर नमुना परिपुर्ण भरुन निवडणूकीची अधिसुचना प्रसिध्द झाल्यानंतर 5 दिवसाच्या आत संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी / सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत मतदार व निवडणूक कर्तव्यावर असलेले मतदारांना टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे त्यासाठी आवश्यक असलेल्या 12/12 ए नमुन्यातील फॉर्म भरुन विहीत कालावधीमध्ये संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी /सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. तरी 46 रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील पात्र मतदारांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'