माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी, वीरमाता यांच्या वेतना संबंधित पेन्शन अदालत, वेटरन मेळावा
सिंधुदुर्गनगरी, दि. 11 (जि.मा.का.) भारतीय सैन्यदलातील माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा/ वीरपत्नी/ वीरमाता यांच्या पेन्शन, ईसीएचएस, सीएसडी कॅटीन या बाबतच्या असणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी माहे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सैनिक कल्याण विभाग, पुणे येथे पेन्शन अदालत/ वेटरन मेळावा घेण्याचे रक्षा लेखा प्रधान नियंत्रक कार्यालय, यांच्याव्दारे नियोजित आहे.
तरी ज्या माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा/ वीरपत्नी/ वीरमाता यांच्या पेन्शन, ईसीएचएस, सीएसडी कॅटीन प्रकारच्या अडीअडचणी असल्यास सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे संपर्क साधुन अर्जाचा नमूना घेवून दिलेल्या नमून्याप्रमाणे तीन प्रतीत अर्ज 16 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या कार्यालयात सादर करावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment