ध्वजनिधीसाठी भालचंद्र जोशी यांच्याकडून 25 हजारांचा धनादेश

सिंधुदूर्गनगरी दि 2 (जिमाका) तोंडवली मालवण येथील हॉटेल नित्यानंद प्राइड होम स्टेचे मालक भालचंद्र पांडुरंग जोशी यांनी ध्वजदिन निधीसाठी 25 हजारांची मदत दिली आहे. या रकमेचा धनादेश आज सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उमेश आईर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. समाजातील अशा दानशूर व्यक्तींनी देशासाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'