मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना गतिमानता पंधरवड्याचे यशस्वी आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि. 5 (जि.मा.का.) उद्योग मंत्रालयाच्यावतीने 18 ते 30 डिसेंबर 2023 पर्यंत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना गतिमानता पंधरवडा घोषित करण्यात आला होता. या पंधरवाड्या दरम्यान जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन विविध योजना, उपक्रम आणि प्रकरणांची माहिती देण्यात आली होती. या पंधरवाड्यात दोडामार्ग, मालवण, वेंगुर्ला,वैभववाडी, देवगड सावंतवाडी, खारेपाटण, माणगांव, कुडाळ येथे स्वयंराजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जिल्ह्यात विकसित भारत कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना गतिमानता पंधरवडा कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. या पंधरवाड्याच्या अनुषंगाने बॅंकांनी आपल्याकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांवर त्वरित सकारात्मक निर्णय घेऊन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना गतिमानता पंधरवडा निरंतर सुरु राहण्यासाठी सहकार्य करावे. तसेच बँक शाखांनी किरकोळ कारणास्तव परत केलेल्या प्रस्तावाचे पुनरुज्जीवन व पुनर्विलोकन करुन संबंधित लाभार्थ्याना योग्य न्याय द्यावा. तसेच जास्तीत जास्त प्रस्वाव या योजनेमध्ये पात्र करण्यासाठी प्रशासनास नावे कळविण्यात यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी यावेळी केले. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'