यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा लाभ घ्याव

ा सिंधुदुर्गनगरी, दि.25 (जि.मा.का): विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुधारीत योजना नव्याने राबविण्यातकरीता शासनाने मान्यता देण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे. या योजनेचा लाभ घेवून विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गातील कुटूंबाचे राहणीमान उंचावणे त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढून त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी, यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. चिकणे यांनी केले आहे. या योजनेचे लाभ घेण्यासाठीचे निकष पुढीलप्रमाणे आहेत, लाभार्थी धनगर कुटुंबातील भटक्या –क या मुळ प्रवर्गातील असावा. लाभार्थ्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 1.20 लक्ष पेक्षा कमी असावे. लाभार्थी कुटुंबाचे स्वत:चे मालकीचे घर नसावे. लाभार्थी कुटुंब हे भूमिहीन असावे. लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा. लाभार्थी कुटुंबाने महाराष्ट्र राज्यात कोठेही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. सदरहू योजनेचा लाभ पात्र कुटुंबातील एकाच व्यक्तीस देण्यात येईल. लाभार्थी वर्षभरात 6 महिने एका ठिकाणी वास्तव्यास असावा. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'