तळेरे- वैभववाडी - गगनबावडा - कोल्हापूर मार्ग
(करुळ घाट ) 22 जानेवारीपासून ते 31 मार्च पर्यंत बंद
रस्ता दुपदरीकरण सुरू
पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी,: तळेरे- गगनबावडा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 जी च्या करूळ घाटातील 5 किमी भागात दुपदरीकरणाचे काम दिनांक 15 जानेवारी पासून ते 31 मार्च 2024 या कालावधीत करण्यात येणार आहे. या करुळ घाटात एकेरी वातहूक चालू ठेवणे शक्य नसल्याने या भागात काम सुरु असताना पूर्ण वेळ वाहतूक सुरु ठेवणे शक्य होणार नाही व ते धोकादायक ठरणारे आहे. तसेच डोंगराकडील बाजूचे रुंदीकरण, दरीकडील बाजूस संरक्षक भिंत बांधणीचा विचार करता चालू कामामध्ये एकेरी वाहतूक ठेवणेही सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक होणार आहे. तरी करूळ घाटातील रस्ता दुपदरीकरणाचे काम रात्रंदिवस काम करताना विना अडथळा होण्याकरिता दिनांक 15 जानेवारी ते 31 मार्च 2024 या कालावधीत राष्ट्रीय महामार्ग क्र 166 जी वरील सर्व प्रकारची वाहतूक पुर्णवेळ पूर्णतः बंद करून पुढीलप्रमाणे उपलब्ध पर्यायी मार्गावरुन वळविण्यात आली असून या पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
अ.क्र
मार्ग
अंतर
1
तळेरे – फोंडा घाट – राधानगरी – ठिकपुर्ली – कळंबा – कोल्हापूर
(प्रवासी व अवजड वाहतूक )
123.00 कि.मी.
2
तळेरी – भुईबावडा – गगनबावडा - कळे- कोल्हापूर (प्रवासी वाहतूक )
107.00 कि.मी.
3
तळेरे – वैभववाडी – उंबर्डे- तळवडे अनुस्कुरा – वाघव- केर्ले- कोल्हापूर (प्रवासी व अवजड वाहतुक)
128.00 कि.मी.
4
तळेरे – वैभववाडी – अनुस्कुरा – वाघवे – केर्ले – कोल्हापूर
(प्रवासी व अवजड वाहतुक)
129.00 कि.मी.
करूळ घाटातील रस्ता दुपदरीकरणाचे काम रात्रदिवस काम करताना विना अडथळा होण्याकरीता तळेरे- वैभववाडी – गगनबावडा – कळे - कोल्हापूर या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक दिनांक 22 जानेवारी ते दिनांक 31 मार्च 2024 या कालावधीत पूर्णवेळ वाहतूकीकरिता बंद करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी जारी केले आहे.
कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी यांनी मोटार वाहन कायदा 1988 कलम 116 नुसार वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला रस्ता व पर्यायी वाहतूक मार्ग लोकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी दिशादर्शक फलक, वाहतूक संकेत चिन्हें लोकांना समजेल अशा भाषेत लावण्याची किंवा उभारण्याची कार्यवाही करावी, असे जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी आदेशीत केले आहे.
००००००
राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग (जिमाका) दि. 29 : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन दरवर्षी राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येते. यापूर्वी पिकस्पर्धेची सर्व प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवली जात होती. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी, खरीप हंगाम २०२६ पासून पिकस्पर्धेचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र ऑनलाईन संगणक प्रणाली (Online Portal) सुरू करण्यात आलेली आहे.त्यानुषंगाने अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा सन २०२६-२७ साठी राज्यस्तरावरून कृषी विभागामार्फत खरीप पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. सर्वसाधारण ...
Comments
Post a Comment