एकरकमी परतावा योजनेंत लाभार्थीना 50 सवलत
सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जि.मा.का.) महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय (ओबीसी) वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांची उपकंपनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लि. सिंधुदुर्ग यांच्यामार्फत विविध कर्ज योजनेतंर्गत जिल्ह्यातील इतर मागास (ओबीसी) प्रवर्गातील लाभार्थींना स्वयंरोजगाराकरीता अल्प व्याजदराने कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे.
जिल्ह्यातील या महामंडळाच्या थकीत कर्ज रक्कम असलेल्या लाभार्थींनी ओबोसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपुर्ण थकीत कर्ज रक्कमेच्या एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची एकरक्कमी परतावा (OTS) योजना दि. 31 मार्च 2024 पर्यंत राबविण्यात येत आहे. महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे,असे आवाहन शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment