जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाचा उपक्रम चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का): जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयामार्फत 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान 'चाचा नेहरु बाल महोत्सव – 2023-24' चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,ओरोस येथे होणार असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी कळविले आहे. महाराष्ट्र शासनामार्फत, महिला व बाल विकास विभाग यांच्या अंतर्गत, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अधिपत्याखालील जिल्ह्यातील इतर मुले व बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय/स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मर्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाब, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव-2023-24 चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये मुले व मुली वैयक्तिक व सांघिक खेळामध्ये सहभागी होणार असून यामध्ये वैयक्तिक नृत्य, गायन, एकपात्री अभिनय, सामुहिक नृत्य, लांब उडी, कॅरम, बुध्दीबळ, गोळा फेक, कब्बडी, खो खो, रिले, क्रिकेट, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी स्पर्धाचे आयोजन केलेले आहे. असे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'