जलयानांची (बोटी) नोंदणी करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 10 (जि.मा.का.) प्रादेशिक बंदर अधिकारी वेंगुर्ला बंदरे समूहातंर्गत कार्यक्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यातील सागरी किनारी जलक्रीडा प्रवासी वाहतूक व मालवाहतूक करण्याऱ्या जलयानांची (बोटी) नोंदणी केली नसल्यास प्रादेशिक बंदर अधिकारी कार्यालयात आवश्यक कागदपत्रे सादर करुन जलयांनाची नोंदणी करुन घेण्याचे आवाहन प्रादेशिक बंदर अधिकारी यांनी केले आहे. प्रादेशिक बंदर अधिकारी, वेंगुर्ला समुहातंर्गत कार्यक्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यातील सागरी किनारी मालवाहतूक करणाऱ्या जलयानांची बोटी नोंदणी न करता अनधिकृतपणे जलवाहतुकीमुळे जीवीत व मालमत्तेस हानी पोहचण्याची शक्यता लक्षात घेता नोंदणी न करण्यात आलेल्या जलयानांची त्वरीत नोंदणी सक्षम प्राधिकाऱ्यांकडून घेण्याबाबतचे आवाहन प्रादेशिक बंदर अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ, वेंगुर्ला बंदरे समूह, वेंगुर्ला यांनी केले आहे. अनधितकृत हातपाटीने रेती उत्खनन व वाहतुक करणारी जलयान तसेच महत्वाचे म्हणजे सागरी सुरक्षा व अतिरेकी कारवायांची शक्यता पाहता स्थानिक जलयांनाची माहिती ओळख असणे महत्वाचे असून विना नोंदणी जलयांनाची नोंदणी झाल्यास सागरी सुरक्षेच्या अनुषंगाने आवश्यक वेळी कारवाई करणे सोयीस्कर होणार आहे. यासाठी विना नोंदणीकृत जलयानांची नोंदणी होणे अत्यंत गरजेचे आहे. सागरी सुरक्षा व लोकहिताची बाब लक्षात घेऊन बातमी प्रसिध्द झाल्यापासून 4 दिवसांच्या आत संबंधित जलयान/ बोट मालकांनी आवश्यक कागदपत्रे या कार्यालयास सादर करुन आपआपल्या बोटीची नोंदणी करुन घेण्याचे आवाहन प्रादेशिक बंदर अधिकारी, वेंगुर्ला बंदरे समूह यांनी केले आहे.. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'