बंदिस्त अथवा मोकळ्या जागेतील शासनाने ठरवून दिलेल्या व्यक्तींची मर्यादा विवाह सोहळा परवानगीसाठी तहसिलदार तर सामाजिक, सांस्कृती, राजकीय मेळावा परवानगीसाठी प्रांताधिकारी
सिंधुदुर्गनगरी, दि. 4 (जि.मा.का) : बंदिस्त सभागृहामध्ये किंवा मोकळ्या जागेत लग्नसमारंभासाठी त्या त्या तालुक्यातील तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या व्यक्तींच्या मर्यादेत परवानगी देण्याबाबत प्राधिकृत करण्यात आले आहे. तसेच बंदिस्त सभागृहासाठी किंवा मोकळ्या जागेत इतर सामाजिक, सांस्कृतीक, राजकीय किंवा धार्मिक कार्ये व मेळाव्याच्याबाबतीत त्या त्या उपविभागातील उपविभागीय अधिकारी यांना शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या व्यक्तींच्या मर्यादेत परवानगी देण्याबाबत प्राधिकृत करण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी आज आदेश दिला आहे.
00000
Comments
Post a Comment