उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात 24 रोजी लायसन्स व फिटनेस सर्टिफिकेटचे कामकाज होणार नाही

सिंधुदुर्गनगरी, दि. 11 (जि.मा.का): उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात दि. 24 जानेवारी 2022 रोजी शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती व योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे. तरी ज्या नागरिकांनी या कामांसाठी अपॉईंटमेंट घेतल्या आहेत त्यांची कामे दि. 25 व 27 जानेवारी 2022 रोजी अपॉईंटमेंटशिवाय करून देण्यात येणार, असल्याची माहिती सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी दिली. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अस्थापनेवरील 4 मोटार वाहन निरीक्षक व 9 सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक दि. 22 ते 24 जानेवारी 2022 या कालावधीत विभागीय अर्हता परीक्षा व विभागीय सेवाप्रवेशोत्तर परीक्षेसाठी ठाणे येथे उपस्थित राहणार आहेत. या कालावधीत कार्यालयात फक्त 1 मोटार वाहन निरीक्षक कर्तव्यावर असणार आहेत. त्यामुळे दि. 24 जानेवारी रोजी शिकाऊ तसेच पक्की अनुज्ञप्ती व योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे. तरी या कामांसाठी अपॉईंटमेंट घेतलेल्या नागरिकांनी सदर दिवशी कार्यालयात येऊ नये असे आवाहनही श्री. काळे यांनी केले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'