स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड़्मय पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिक पाठवण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि. 5 (जि.मा.का) : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड़्मय निर्मितीसाठी 2021 करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड़्मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात, तसेच मराहाष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दि. 31 जानेवारी 2022 रोजी पर्यंत पाठवाव्यात असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांनी केले आहे.
1 जानेवारी 2021 ते 31 जानेवारी 2021 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका, मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा), तसेच सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई 400025 यांच्या कार्यालयात विनामुल्य उपलब्ध होतील. त्याचबरोबर राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नवीन संदेश या सदरात 'स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड़्मय पुरस्कार 2021 नियमावली व प्रवेशिका' या शिर्षकाखाली व What's new या सदरात 'Late Yashwantrao Chavan State Literature Award 2021 Rules Book and Application Form' या शिर्षकाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियम पुस्तिका उपलब्ध होतील.
प्रवेशिका पूर्णतः भरून आवश्यक साहित्यासह दि. 31 जानेवारी 2022 पर्यंत पोहचतील अशा बेताने सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाठवाव्यात. लेखक / प्रकाशक यासाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. प्रवेशिका व पुस्तके पाठविताना लिफाफ्यावर / पाकिटावर 'स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड़्मय पुरस्कार 2021 साठी प्रवेशिका' असा स्पष्ट उल्लेख करावा. विहीत कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत.
00000
Comments
Post a Comment