25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा

सिंधुदुर्गनगरी दि.24(जि.मा.का): जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा निवडणूक अधिकारी आणि संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ यांच्या सयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ, येथे सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण DEO Sindhudurg या यु टयुब चॅनेलवर करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी 12 व्या राष्ट्रीय मतदार दिवस आयोजित कार्यक्रमाचा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.जयकृष्ण फड उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी आणि जिल्हा निवडणुक अधिकारी हे असतील, कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारण मंडळ, कुडाळ तथा कुडाळ हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज, कुडाळ चे माजी प्राचार्य का.आ सामंत हे प्रमुख वक्ते असणार आहेत. जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमाच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्याचा मा. जिल्हाधिकारी आणि मान्यवराच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. विविध स्पर्धेतील विजेते या कार्यक्राच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांची नावे, स्पर्धेनिहाय खालीलप्रमाणे आहेत. निंबध लेखन स्पर्धा (शालेयस्तर) प्रथम:- गौतमी उदय घाडी, न्यू इंग्लिश स्कूल आचारा ता. मालवण. व्दितीय:- अफान खतीब, मिलाग्रीस स्कूल, सावंतवाडी, ता. सावंतवाडी. तृतीय:- सिध्दी संदीपकुमार कुंभार , एस.एम. हायस्कूल कणकवली, ता. कणकवली. निबंधलेखन (महाविद्यालयीन स्तर) प्रथम:- संचिता पांडुरंग निर्गुण, आर. पी.डी. ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी ता. सावंतवाडी. व्दितीय:- प्रफुल्ली प्रभाकर दळवी, कै.आनंदीबाई रावराणे,कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैभववाडी, ता . वैभववाडी. तृतीय :- मयुरेश सदानंद सावंत, राजमाता सत्वशिलादेवी भोसले ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी, ता. सावंतवाडी. रांगोळी स्पर्धा :- प्रथम, सायली मि‍लिंद भैरे, आर. पी.डी.ज्युनिअर कॉलेज सावंतवाडी,ता. सावंतवाडी. व्दितीय:- वैशाली व्ही. पाटील आर.पी.डी. ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी ता. सावंतवाडी. तृतीय :- मुग्धा जोशी आर.पी.डी. ज्युनिअर कॉलेज सावंतवाडी,ता. सावंतवाडी. चित्रकला स्पर्धा :- प्रथम, विष्णुप्रसाद सावंत, राजमाता सत्वशिलादेवी भोसेले ज्युनिअर कॉलेज सावंतवाडी, ता. सावंतवाडी. व्दितीय:- सानिया विठोबा हरयाण, शेठ न.म. विद्यालय खारेपाटण ता. कणकवली . तृतीय:- कु.निलेश संतोष चव्हाण , भंडारी एज्युकेशन सोसायटीज कनिष्ठ महाविद्याल, मालवण ,ता. मालवण. डिजीटल पोस्टर स्पर्धा :- प्रथम, श्रध्दा सतीश पाटकर, मु.पो. हुंबरट, ता. कणकवली, व्दितीय:- प्रणाली साईनाथ देसाई, मु.पो. ओरोस, ता. कुडाळ .तृतीय:- गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर मु.पो. माळगाव बागायत, ता. मालवण . या स्पर्धांतील विजयी स्पर्धेकांचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचे स्वाक्षरीचे प्रमाणपत्र संबंधित तालुक्याचे तहसिलदार यांचे कार्याल्यामार्फत वितरीत करण्यात येणार आहे. असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी कळविले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'