गोर-गरीब लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी सर्वेक्षण करा - अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का) : शिधापत्रिका धारकांना पत्ता बदलला असता नवीन ठिकाणी अन्न सुरक्षा लाभ मिळण्याबाबत काही कारणास्तव अडचणी निर्माण होत आहेत. गोर-गरीब लाभार्थी अन्न सुरक्षा योजनेबाबत वंचित राहता कामा नये यासाठी सर्वेक्षण करा, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी दिले. जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक आज घेण्यात आली. श्री. बर्गे म्हणाले, तालुकास्तरीय दक्षता समितींच्या कामांचा आढावा घ्या. समित्यांची दरमहा बैठक होते का? या बाबत माहिती घ्यावी. धान्य साठवणूकीची क्षमता आणि व्यवस्था याबाबत आढावा घ्यावा. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राहिलेली कामे पाठपुरावा करू पूर्ण करून घ्यावी. नायब तहसिलदार संजय गवस यांनी यावेळी माहिती दिली. बैठकीला सदस्य मेघनाथ धुरी यांच्यासह अन्य प्रतिनिधी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'