राज्य सेवा पूर्व परीक्षा 23 जानेवारी रोजी

सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि.20: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 ही रविवार दि.23 जानेवारी 2022 रोजी होत आहे.कणकवली तालुक्यातली विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला व कणकवली कॉलेज कणकवली, या दोन उपकेंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेची वेळ सकाळी 10 ते दुपरी 12 व दुपारी 3 ते सायंकाळी 5 अशी असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी कळविले आहे. विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली, बैठक क्रमांक KD001001 ते KD001432 व कणकवली कॉलेज कणकवली बैठक क्रमांक KD002001ते KD002407 या उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या आयोजनाबाबत उमेदवारांना महत्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे आहेत. Ø आयोगामार्फत आयोजित परीक्षामध्ये कॉपीचा, गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. Ø अशा प्रकरणी आयोगाकडून संबंधितांवर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे. Ø परीक्षांकरिता आयोगाने कडक उपाययोजना केलेल्या आहेत. Ø परीक्षा उपकेंद्रांवर उमेदवारांची आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेल्या सेवा पुरवठादार संस्थेच्या कर्मचाऱ्याकडून तपासणी (Frisking)करण्यात येणार आहे. Ø उमेदवाराला स्तत:चा जेवणाचा डबा, अप्लोपहार व पाण्याची बाटली आणण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. Ø दोन पेपरच्या मधल्या वेळामध्ये उमेदवारांना परीक्षा उपकेंद्राच्या बाहेर जाण्यास मनाई आहे. Ø आयोगाकडून परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी विशेष निरीक्षक भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. Ø जिल्हाधिकारी स्वत: पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार असल्याचे ही निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी कळविले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'