मद्य विक्री बंदीचे आदेश

सिंधुदुर्गनगरी, दि.04 (जि.मा.का): सार्वजनिक लोकसभा निवडणूक 2024 च्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि. 7 मे 2024 रोजी मतदान होणार असून दि. 4 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणूका, खुल्या, मुक्त व निर्भय वातावराणात पार पाडण्यासाठी तसेच संबंधीत निर्वाचन क्षेत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मुंबई मद्य निषेध अधिनियम 1949 चे कलम 142 अन्यये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व देशी/ विदेशी दारुविक्रीची दुकान (सीएल-3, एफएल-2 एफएल-3, एफएल/बीआर-2 टिडी-1 इत्यादी) अनुज्ञप्ती खालीलप्रमाणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी कळविले आहे. अ.क्र कोरडे दिवस बंद कार्यक्षेत्र बंदचा कालावधी १ ५मे २०२४ मतदानाच्या अगोदरचे दिवस पुर्ण जिल्हा सायंकाळी ५ वाजले पासून बंद २ ६ मे २०२४ मतदानाच्या अगोदरचे दिवस पुर्ण जिल्हा संपूर्ण दिवस बंद ३ ७ मे २०२४ मतदानाचा दिवस पुर्ण जिल्हा मतदान पुर्ण होई पर्यंत बंद ४ ४ जून २०२४ मतमोजणीचा दिवस पुर्ण जिल्हा संपूर्ण दिवस बंद या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून त्यात कसूर झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांविरुध्द कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी आदेशात म्हटले आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'