खर्च निरीक्षक अंकुर गोयल यांची खर्च सनियंत्रण कक्षाला भेट

सिंधुदुर्गनगरी दि 5 (जिमाका) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता कार्यान्वित करण्यात आलेल्या खर्च सनियंत्रण कक्षास 46 रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त खर्च विभागाचे निवडणूक निरीक्षक अंकुर गोयल यांनी भेट देऊन पाहणी केली आणि समितीच्या कामाजाची माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे, सहायक जिल्हाधिकारी विशाल खत्री, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, खर्च सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी शिवप्रसाद खोत, अमित मेश्राम, निवडणूक निरीक्षकांचे संपर्क अधिकारी महेंद्र किणी आदी उपस्थित होते. यावेळी खर्च नियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी शिवप्रसाद खोत यांनी खर्च सनियंत्रण कक्षाच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली. जिल्हा खर्च सनियंत्रण समिती मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या विधानसभा मतदार संघातील उमेदवारांचे खर्चाचे लेखे एकत्रित करुन जिल्हा खर्च सनियंत्रण समिती रत्नागिरी कक्षास पाठविले जाते असेही श्री खोत यांनी यावेळी सांगितले. खर्च सनियंत्रण कक्षाचे कामकाज जाणून घेतल्यानंतर निवडणूक निरीक्षक अंकुर गोयल यांनी समितीमार्फत करण्यात येत असलेल्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'