जिल्ह्यात कलम 144 लागू

सिंधुदुर्गनगरी दि.4 (जिमाका)- जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवणडूक-2024 च्या अनुषंगाने सर्व नियोजित कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पडावेत, मतदान शांततेने व व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आणि कोणताही उपद्रव किंवा अडथळा न होता मतदारांना आपला अधिकार बजावण्याचे पूर्ण स्वातंत्र मिळावे, मतदारांना आपला मतदानाचा हक्क निर्भयतेने बजावता यावा यासाठी सर्व परवानाधारकांना शस्त्र बाळगण्यास व बरोबर घेवून फिरण्यास, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थीती अबाधित राखण्यासाठी, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये. म्हणून जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) प्रमाणे अधिकाराचा वापर करून दिनांक 4 जून 2024 रोजी 24 वाजेपर्यतच्या कालावधीमध्ये संपूर्ण भूभागात मनाई आदेश जारी केला आहे. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'