लोकसभा निवडणूक -२०२४ मतदान पूर्व दिवशी तसेच मतदानादिवशी वृत्तपत्रात प्रसिध्द करावयाच्या जाहिरातींसाठी प्रमाणिकरण बंधनकारक

सिंधुदुर्गनगरी दि. ४ (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान पूर्व दिवशी तसेच मतदानाच्या दिवशी केवळ वर्तमान पत्रात प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातीचा मजकूर प्रसिध्दीच्या आधी प्रमाणिकरण करुन घेणे उमेदवारांना बंधनकारक आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेला ॲनेक्चर २७ हा उमेदवार अथवा उमेदवारांने प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधीचा अर्ज (अर्जावर स्वत: उमेदवाराची सही अथवा प्रतिनिधीची सही असल्यास त्याबाबत उमेदवाराचे प्रतिनिधी नियुक्त केलेले घोषणापत्र अर्जासोबत हवे), जाहिरात मजकुराची सोबत दोन प्रतीत, जाहिरात तयार करण्यासाठी आलेला खर्च व त्याचे देयक, जाहिरात कोणत्या वृत्तपत्रात प्रसिध्दीला देणार याबाबतची माहिती व त्याबाबतच्या संभाव्य खर्चाचा तपशील आवश्यक आहे. मतदान पूर्व दिवशी तसेच मतदानादिवशी (म्हणजेचे दि. ६ मे व ७ मे रोजी) केवळ वर्तमान पत्रात करावयाच्या जाहिरातीचा मजकूर प्रसिध्दीच्या दोन दिवस आधी प्रमाणिकरण करुन घेणे बंधनकारक आहे. उमेदवारांनी अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी जाहिरातींच्या प्रमाणिकरणासाठी जिल्हा माहिती कार्यालयातील माध्यम कक्ष, मुख्य प्रशासकीय इमारत, सी ब्लॉक, पहिला मजला, सिंधुदुर्गनगरी येथे कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'