शासनाच्या कल्याणकारी निधी योजनेतून माजी सैनिकास घरबांधणीसाठी आर्थिक मदत

सिंधुदुर्गनगरी दि. 30 (जिमाका) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत शासनाकडून वेळोवेळी निर्धारीत केलेल्या विविध योजनांतून जिल्ह्यातील पात्र शहीदांच्या वीरपत्नी, विरमाता, वीरपिता, माजी सैनिक, माजी सैनिक विधवापत्नी, अपंग माजी सैनिक, त्यांची अनाथ पाल्ये, अवलंबित यांच्याकरीता कल्याणकारी निधीतून शैक्षणिक व पुनर्वसनाच्या विविध प्रकारच्या आर्थिक मदती दिल्या जातात. त्या अनुषंगाने माजी सैनिक शेफुद्दिन अजीज नाईक, रा. माणगांव, ता. कुडाळ यांना सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्यावतीने घरबांधणीकरिता दिली जाणारी आर्थिक मदत रक्कम रू. 50,000/- चा धनादेश जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या हस्ते अदा करण्यात आला. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कर्मचारी सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उमेश आईर व अनिल नाटलेकर हे उपस्थित होते. तरी जिल्ह्यातील पात्र शहीदांच्या वीरपत्नी/विरमाता/ वीरपिता/ माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नी, अपंग माजी सैनिक, त्यांची अनाथ पाल्ये/ अवलं‍बित यांनी अश्या प्रकारच्या कल्याणकारी योजनांचा (उदा.शैक्षणिक/ स्वयंरोजगार/ पुनर्वसन) लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 02362-228820 वर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी, मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'