मतदान केंद्र व परिसरात मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी, दि.04 (जि.मा.का): लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी दि. 7 मे 2024 रोजी प्रत्यक्ष मतदान होणार, तसेच मतदानाच्या पुर्वी 48 तास अगोदर प्रचार बंद करणे अनिवार्य आहे. त्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचे पालन करणेचे दृष्टीने उमेदवार, राजकिय पक्ष, अन्य कोणीही व्यक्ती यांना मतदानाच्या पूर्वी 48 तासापासून ते मतदान संपेपर्यंत कोणत्याही प्रकारचा प्रचार करता येणार नाही, आदर्श आचारसंहितेचा भंग होईल असे कोणतेही कृत्यही करता येणार नसल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे यांनी आदेशित केले आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 130,133,123,(5) अन्वये संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदान केंद्रे व परिसरात खालील कृत्य करण्यास या आदेशान्वये मनाई करत आहे. मतदान केंद्राच्या आवारात 100 मी. च्या आत कोणत्याही प्रकारचे पोस्टर्स, बॅनर्स लावता येणार नाहीत. तसेच मतासाठी मतदारांकडे प्रचार व आर्जव करणे मनाई आहे. एखाद्या विशिष्ट उमेदवाराला मत न देण्याविषयी कोणत्याही मतदाराची मनवळवणी करता येणार नाही. लाऊडस्पीकर, मेगाफोन यावर निर्बंध आहेत. मतदान केंद्राच्या हद्दीत 200 मी. च्या आत कोणताही प्रचार, आक्षेपार्ह बाब, पोस्टर्स, बॅनर्स प्रसिध्द करणे यावरही निबंध आहेत. लोकप्रतिनिधीत्य अधिनियम 1951 में कलम 133 अन्वये भ्रष्टाचार आणि कलम 123 (5) अन्वये वाहनातून मतदारांची वाहतुक केल्यास अशा राजकीय पक्षाचे प्रतिनीधी अथवा अन्य कोणीही व्यक्ती असल्यास त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिलेला परवाना वाहनाच्या समोरच्या काचेवर (विंड स्क्रिन) लावावेत. वरीलप्रमाणे घालण्यात आलेले निर्बधांचा अवमान कोणत्याही व्यक्तीकडून झाल्यास उक्त कलमाखाली अशी व्यक्ती दंडनीय असलेल्या दखलपात्र गुन्ह्यास पात्र ठरेल, याची नोंद घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे यांनी दिले. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'