कंटेन्मेंट झोन
कणकवली तालुक्यातील मौजे कलमठ सिद्धार्थनगर,
मौजे ओसरगाव कानसळी व मौजे शिरवल तळेवाडी येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 11 : कणकवली तालुक्यातील मौजे- कलमठ सिद्धार्थनगर येथील घर क्र. 711 चा परिसर, मौजे ओसरगाव कानसळी येथील घर क्र. 1175 चा 100 मीटर परिसर व मौजे शिरवल तळेवाडी येथील घर क्र. 489 चा परिसर येथे कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 23 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.
00000
देवगड तालुक्यातील मौजे देवगड जगतापवाडी आणि
ब्राम्हणवाडी, मौजे जामसंडे साईलप्राईड बिल्डिंग व
मौजे बापार्डे गायकवाडवाडी येथे कंटेन्मेंट झोन
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 11 : देवगड तालुक्यातील मौजे- देवगड जगतापवाडी येथील घर क्र. 602 चा परिसर, व ब्राम्हणवाडी येथील घर क्र. 1170 चा परिसर, मौजे जामसंडे साईलप्राईड बिल्डिंग सातपायरी रुम नं. 202 चा परिसर व मौजे बापार्डे गायकवाडवाडी येथील घर क्र. 64-ब चा परिसर येथे कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 23 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.
00000
Comments
Post a Comment