7 व्या आर्थिक गणनेचे काम सुरु

सिंधुदुर्गनगरी, (जि.मा.का) दि. 8 :  केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणीअंतर्गत राष्ट्रव्यापी 7 वी आर्थिक गणना करण्यात येत आहे. या गणनेमध्ये सर्व उद्योग, व्यवसाय व सेवा यांची गणना प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा सांख्यिकी अधिकारी अ.आ.कुलकर्णी यांनी दिली.

            या 7 व्या आर्थिक गणनेचे क्षेत्रकाम कॉमन सर्व्हिस सेंटर यांच्याकडून नेमण्यात आलेल्यया प्रगणक व पर्यवेक्षक यांच्याकडून केले जात आहे. कोविड-19 मुळे लागू करण्यात आलेल्या लॉगडाऊन काळात जिल्ह्यातील आर्थिक गणनेचे क्षेत्रकाम थांबविण्यात आले होते. तथापि सदर गणनेचे काम पुन्हा सुरु करण्यात येत आहे. तरी या 7 व्या आर्थिक गणनेला जिल्ह्यातील नागरिकांनी, व्यापारी व्यवसायिक व उद्योजकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.  

00000

निवृत्तीवेतनधारक /कुटुंब निवृत्तीवेतनधारक

यांनी हयातीचा दाखला 31 डिसेंबर द्यावा

सिंधुदुर्गनगरी, (जि.मा.का) दि. 8 : राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक /कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्या हयातीच्या दाखल्यासाठी 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. शिवप्रसाद खोत यांनी दिली.

            ज्या निवृत्तीवेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारक ज्या बँकेतून पेन्शन घेतात, त्या बँकेमध्ये सादर करावे. तसेच 1 ऑक्टोबर 2020 रोजी  80 वर्षे पूर्ण केलेल्या निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी 1 ऑक्टोबर ते 30 डिसेंबर पर्यंत हयातीचा दाखला सादर करावा, याची सर्वसंबंधित निवृत्तीवेतनधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

0000

 

 माजी सैनिकांच्या इ.सी.एच.एस.

योजनेसाठी ऑनलाईन आवेदन

सिंधुदुर्गनगरी, (जि.मा.का) दि. 8 :  दुसऱ्या महायुद्धातील माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, आपतकालीन कमिशनड अधिकारी, शॉर्ट सर्व्हिस कमिशनड अधिकारी, स्वेच्छा निवृत्तीधारक ज्यांना माजी सैनिकांचा दर्जा प्राप्त झालेला आहे, यांनी इ.सी.एच.एस. सदस्यत्वासाठी लवकरात लवकर आपले ऑनलाईन आवेदन सादर करावे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली.

            इ.सी.एच.एस. सभासद झाल्यानंतर आवश्यक त्या वैद्यकिय सुविधा प्राप्त होणार आहेत. तसेच सदर योजना पूर्वीप्रमाणेच कार्यरत आहे. तरी या याचा लाभ वरीलप्रमाणे निवृत्तीधारक व त्यांच्या विधवा पत्नीने घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

 

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'