शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे, जुन्या अर्जाचे नुतनीकरणासाठी मुदवाढ

सिंधुदुर्गनगरी दि. 19 (जिमाका) : भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी अनु.जाती, इमाव, विजाभज व विशेष मागास प्रवर्गासाठी सन 2023-24 करीता शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नुतनीकरण करण्यासाठी दि. 30 जून 2024 पर्यंत मुदवाढ देण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याण चे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे. शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सुरु असून जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालये तसेच संबंधित महाविद्यालयातील प्रायार्च, विद्यार्थी व पालक यांना आवाहन करण्यात येते की, जे विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित असतील अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज अखेर करावे. विहित वेळेत विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची आहे. ही योजनेपासून मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहिल्यास यास संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य जबाबदार राहतील असे पत्रकात नमूद आहे. महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले अर्जाची छाननी करुन परिपूर्ण अर्ज मंजूरीस्तव या कार्यालयाकडे वेळेवर वर्ग करणे. संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य यांनी तात्काळ कार्यवाही करावी. शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्ज नुतनीकरण करण्याबाबत समस्या उद्भवल्यास अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय दूरध्वनी क्र. 02362 228882 येथे संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण चे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'