राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि. 13 (जिमाका) : अनुसूचित जातीच्या मुला- मुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती निवडीसाठी सन 2024-25 करीता ऑफलाईन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रतिवर्षी अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरीता अनु. जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज www.maharashtra.gov.in (जलद दुवे ताज्या घडामोडी) येथे नमुद संकेतस्थळावरुन अर्ज डाऊनलोड करुन तो परिपुर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह दिनांक १२ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यत पोस्टाने किंवा समक्ष समाज कल्याण आयुक्तालय ३ चर्च रोड, पुणे 411001 येथे सादर करावेत. अर्जाचा नमुना, योजनेची सविस्तर माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्यावी. या योजनेच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय दूरध्वनी क्र.०२३६२-२२८८८२ येथे संपर्क साधावा. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'