जिल्ह्यात 19 जूनपासून पोलीस भरती प्रिक्रिया सुरू

सिंधुदुर्गनगरी दि.12(जिमाका): सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील 118 पोलीस शिपाई (5 बॅण्डस्मन पदासह) व 24 चालक पोलीस शिपाई या रिक्त पदांसाठी बुधवार दि.19 जून 2024 रोजी पोलीस मुख्यालय येथील परेड मैदानावर अर्ज भरलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी होणार असल्याचे माहिती पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. पोलीस शिपाई पदासाठी 5 हजार 920 बॅण्डस्मन पदासाठी 783 व चालक पोलीस शिपाई पदासाठी 1 हजार 339 असे एकूण 8 हजार 42 उमेदवारांचे आवेदन अर्ज प्राप्त झालेले आहेत. दि.19 जून 2024 रोजी पासून पोलीस मुख्यालय येथील परेड मैदानावर घेण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले असून उमेदवारांना टप्याटप्याने बोलविण्यासाठी 'महाआयटी विभागाकडून प्रवेशपत्र उमेदवारांच्या ई-मेल/एसएमएस या माध्यमाद्वारे पाठविले जाणार आहेत. हि भरती प्रक्रीया ही तटस्थपणे, निःपक्षपातीपणे व पारदर्शक पार पाडली जाणार असून भरतीप्रक्रीये दरम्यान गैरप्रकार व भ्रष्टाचार होणार नाही, याकरीता योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे. पोलीस भरती प्रक्रीये दरम्यान उमेदवारांना व त्यांचे नातेवाईकांना भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या लोकांकडून ओळखी संदर्भात व अन्य प्रकाराचे आमिष दाखवून आर्थीक देवाण घेवाणीचे गैरव्यवहार करुन फसवणुक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग येथे समन्वय अधिकारी म्हणून स्वतंत्र पोलीस अधिकाऱ्याची नेमणुक करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे गैरव्यवहार निदर्शनास आल्यास त्याबाबतची माहिती पोलीस नियंत्रण कक्ष येथील व्हॉटस्अॅप क्र.८२७५७७६२१३ वर व दुरध्वनी क्र. ०२३६२-२२८२०० वर तात्काळ दयावी असे आवाहन पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी केले आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'