शाळाप्रवेशोत्सवनिमित्त विविध कार्यक्रम
सिंधुदुर्गनगरी दि. 13 (जिमाका) : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 1 हजार 360 शाळांमध्ये शनिवार दिनांक 15 जून 2024 रोजी शाळाप्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, प्रतिष्ठीत मान्यवर आणि इतर शिक्षण प्रेमी नागरीक उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. गणपती कमळकर यांनी केले आहे.
शाळा प्रवेशनिमित्त प्रभातफेरी, नवागतांचे स्वागत शाळेच्या प्रांगणात सर्व विद्यार्थी, पालक, सन्मा. निमंत्रीत व व्यक्ती, नवागत विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी एकत्रित येऊन मिरवणूक काढणे, इयत्ता 1 ली व इतर वर्गामध्ये प्रवेश घेणाऱ्या नव्या विद्यार्थ्यांचे पुष्प देवुन स्वागत केले जाणार आहे.
मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण- इयत्ता 1 ली ते 8 वी च्या 51546 विद्यार्थ्यांना 58724 पाठ्यपुस्तक संचाचे वितरण शाळेच्या पहिल्या दिवशी दि. 15 जून 2024 रोजी मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे. वृक्षारोपण कार्यक्रम- शाळेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करणे.
शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमांत जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख व तालुकास्तरावरील सर्व अधिकारी सहभागी होऊन विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करुन प्रेरणा देणार आहेत. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी सर्व खातेप्रमुखांना आदेशित केले आहे.
पाठ्यपुस्तके तालुकानिहाय वितरण पुढीलप्रमाणे आहे.
तालुका
विद्यार्थी संख्या
इयता 1 ली ते 5 वी पाठ्यपुस्तक संच
इयत्ता 6 वी ते 8 वी पाठ्यपुस्तक संच
सावंतवाडी
9320
5283
5733
मालवण
5610
3071
3098
कणकवली
8811
5105
5218
कुडाळ
10738
6001
5796
देवगड
7691
4590
4240
वेंगुर्ला
4352
2536
2452
वैभववाडी
2611
1576
1428
दोडामार्ग
2413
1430
1167
एकूण
51,546
29,592
29,132
००००००
Comments
Post a Comment