ग्रामपंचायतींमधील विलगीकरण कक्षाच्या खर्चास १५ व्या वित्त आयोगाच्या अबंधित निधीमधून मान्यता ग्रामविकास विभागाचे परिपत्रक

सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जिमाका)- एखाद्या ग्रामपंचायतीने कोव्हीड रुग्णांसाठी ग्रामपंचायत क्षेत्रात ३० किंवा त्यापेक्षा जास्त खाटांचे विलगीकरण कक्षाची मागणी केल्यास, अशा कक्षास १५ व्या वित्त आयोगाच्या अबंधित (untied) प्राप्त निधीच्या २५% च्या मर्यादेत खर्च करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे शासन परिपत्रक ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रविण जैन यांनी काढले आहे. २५ मे रोजीच्या या परिपत्रकात म्हटले आहे, कोरोनाच्या आपत्तीजनक परिस्थितीमध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी ग्रामविकास विभागामार्फत विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. यामध्ये अर्सेनिक अल्बम-३० हे होमिओपॕथिक औषध ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करुन देणे, जिल्हा परिषदांना रुग्णवाहिका पुरविणे, जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावताना कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास वारसांना दिलासा देण्यासाठी 50 लाखाचे विमा कवच लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर जर एखाद्या ग्रामपंचायतीने कोव्हीड रुग्णांसाठी ग्रामपंचायत क्षेत्रात ३० किंवा त्यापेक्षा जास्त खाटांचे विलगीकरण कक्षाची मागणी केल्यास, अशा कक्षास १५ व्या वित्त आयोगाच्या अबंधित (untied) प्राप्त निधीच्या २५% च्या मर्यादेत खर्च करण्यास या परिपत्रकान्वये शासन मान्यता देण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायतीमध्ये विलगीकरण कक्ष उभारणीबाबत योग्य ते नियोजन करावे. त्याबाबतचा आढावा घेवून संबंधित ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगाच्या अबंधित(untied) निधीमधून खर्च करण्यास मान्यता द्यावी. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'