जिल्ह्यात 1 लाख 59 हजार जणांनी घेतला पहिला डोस

सिंधुदुर्गनगरी, (जि.मा.का.) दि. 29 - वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 59 हजार 464 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 646 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 6 हजार 698 जणांनी दुसरा डोस घेतला. 8 हजार 529 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 4 हजार 336 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 69 हजार 666 व्यक्तींनी पहिला डोस तर 21 हजार 816 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 59 हजार 171 नागरिकांनी पहिला डोस तर 6 हजार 206 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 12 हजार 452 जणांनी पहिला डोस घेतला आहे. असे एकूण 1 लाख 98 हजार 520 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 1 लाख 98 हजार 240 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 1 लाख 55 हजार 180 लसी या कोविशिल्डच्या तर 43 हजार 60 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 1 लाख 58 हजार 533 कोविशिल्ड आणि 39 हजार 987 कोवॅक्सिन असे मिळून 1 लाख 98 हजार 520 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 8 हजार 60 लसी उपलब्ध असून त्यापैकी 5 हजार 340 कोविशिल्डच्या आणि 2 हजार 720 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 2 हजार 310 लसी शिल्लक असून त्यापैकी 2 हजार 160 कोविशिल्ड आणि 150 कोवॅक्सीनच्या शिल्लक आहेत.

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'