मतदार यादीचा पुनर्निरिक्षण कार्यक्रम घोषित ...उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जयकृष्ण फड /माजी सैनिकांना निवासी इमारत मालमत्ता करातून सूट
मतदार यादीचा पुनर्निरिक्षण कार्यक्रम घोषित
उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जयकृष्ण फड
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 24 : भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2021 या अर्हताकारी दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादींचा विशेष संक्षिप्त पुनर्निरिक्षण कार्यक्रम घोषित केलेला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी दिली.
एकत्रित प्रारुप मतदार यादी मंगळवार दि. 17 नोव्हेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांच्या नोटीस बोर्डवर व पदनिर्देशित ठिकाणी लावून प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदरची अंतिम मतदार यादी दि. 15 जानेवारी 2021 रोजी प्रसिद्ध करणेत येणार आहे.
या मतदार यादीत दावे व हरकती सोमवार दि. 17 नोव्हेंबर 2020 ते मंगळवार दि. 15 डिसेंबर 2020 पर्यन्त स्विकारण्यात येणार आहेत. हे दावे व हरकती स्विकारणेसाठी शनिवार दि. 5 व रविवार दि. 6 डिसेंबर 2020 रोजी तसेच शनिवार दि. 12 व रविवार दि. 13 डिसेंबर 2020 या सुट्ट्यांच्या दिवशी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी सर्व मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) हे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यन्त उपस्थित राहून दावे व हरकती स्विकारणार आहेत. या मोहिमेसाठी जिल्हयातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी सदर विशेष माहिमेसाठी आपले मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ता (Booth Level Agent) यांची नेमणूक करुन, BLA यांना संबंधित मतदान केंद्रावर उपस्थित ठेवावे. या बाबतच्या काही हरकती असल्यास, लेखी स्वरुपात मतदान केंद्रावर, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेकडे देण्यात यावे. असे आवाहन उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.
00000
माजी सैनिकांना निवासी इमारत मालमत्ता करातून सूट
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 24 : सैनिक कल्यण विभागाच्यावतीने ग्रामीण व शहरी भागात राहणाऱ्या माजी सैनिक किंवा त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या एका निवासी इमारत मालमत्तेला करातूट सूट देण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली.
मालमत्ता करातून सूट मिळण्याबाबतचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी माजी सैनिकांचे ओळखपत्राची झेरॉक्स प्रत, मागील मालमत्ता कर भरल्याबाबतच्या पावत्या तसेच मालमत्ता कर माजी सैनिकांच्या पत्नीच्या नावे असल्यास पी.पी.ओ. किंवा पार्ट-2 ऑर्डरची प्रत, डिश्चार्ज पुस्तकात पत्नीच्या नावाचा उल्लेख असलेल्या पानाची प्रत आदी कागदपत्र जोडून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment