वाभवे-वैभववाडी व कसई-दोडामार्ग नगरपंचायतींसाठी 26 नोव्हेंबर पर्यंत हरकती व सूचना नोंदवाव्यात ...जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

वाभवे-वैभववाडी व कसई-दोडामार्ग नगरपंचायतींसाठी 26 नोव्हेंबर पर्यंत हरकती व सूचना नोंदवाव्यात ...जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 13 : जिल्ह्यातील वाभवे-वैभववाडी नगरपंचायत व कसई-दोडामार्ग नगरपंचायत या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नगरपरिषद क्षेत्रातील एक सदस्यीय पद्धतीने प्रभागांची पुर्नरचनेबाबतचा मसुदा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली. जिल्ह्यातील वाभवे-वैभववाडी नगरपंचायत व कसई-दोडामार्ग नगरपंचायत या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नगरपरिषद क्षेत्रातील एक सदस्यीय पद्धतीने प्रभागांची पुर्नरचनेसाठी अनुसुचित जाती व अनुसुचित जमातींच्या स्त्रियांसाठी राखून ठेवायचे प्रभाग नागरीकांच्या मागास प्रभाग (स्त्रियांसाठी राखून ठेवलेला धरुन) व उर्वरित स्त्रियांसाठी राखून ठेवण्यात आलेले प्रभाग दर्शविणाऱ्या आदेशाचा मसुदा अनुक्रमे क्रमांक NPA-2803/2/2020/261 दि. 12 नोव्हेंबर 2020 (वाभवे-वैभववाडी साठी) आणि मसुदा क्रमांक NPA-2803/2/2020/264 दि. 12 नोव्हेंबर 2020 (कसई-दोडामार्ग साठी) या प्रती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या sindhudurg.nic.in या संकेतस्थळावर दि. 18 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिद्धी करण्यात येणार आहे. तसेच सदर प्रत वाभवे-वैभववाडी नगरपंचायत व कसई-दोडामार्ग नगरपंचायत यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत खुली ठेवण्यात आली आहे. याबाबतच्या काही हरकती व सूचना असल्यास त्या लेखी स्वरुपात संबंधित नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्या नावे गुरुवार दि. 26 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत पोहोचेल असे पाठवावेत, यानंतर प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांचा विचार केला जाणार नाही. तसेच राज्य निवडणुक आयोगाने प्राप्त हरकती व सुचनांची सुनावणी देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. तरी संबंधित क्षेत्रातील नागरीकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'