बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप

बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 19 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांना सुरक्षा संच किटचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती सरकारी कामगार अधिकारी यांनी दिली. कुडाळ तालुक्यातील बांधकाम कामगारांना शनिवार दि. 21 नोव्हेंबर रोजी वासुदेवानंद हॉल, कुडाळ येथे सुरक्षा संच किट वाटप करण्यात येणार आहे. तरी कुडाळ तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी याचा लाभ घ्यावा. तसेच इतर तालुक्यातील बांधकाम कामगारांचे सुरक्षा संच किट वाटपाचा कार्यक्रम लवकरच जाहिर करण्यात येणार आहे, असे आवाहन कामगार कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'